11 July, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांची वसमत येथील रुग्णालयास भेट



·   कोरोनाकरीता केलेल्या उपाययोजनाचा घेतला आढावा  

हिंगोली,दि.11: जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. यावेळी आज त्यांनी वसमत येथील उप जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर आणि शासकीय स्त्री रुग्णालयास भेट देवून पाहणी केली. तसेच रुग्णालयात आरोग्य विषयक करण्यात आलेल्या उपाययोजनांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.
यावेळी खासदार राजीव सातव, आमदार चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांची उपस्थिती होती.
****


No comments: