जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 23 रुग्ण
·
जिल्ह्यात
100 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,
दि.20: जिल्हा रुग्णालय, हिंगोली
यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 23 नवीन कोविड-19 चे रुग्ण
आढळून आले आहेत. कोरोना केअर सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी
दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. खडकपुरा हिंगोली येथील सात
जण, तालाबकट्टा हिंगोली येथील पाच जण, वार्ड क्र. 1 बालाजी नगर सेनगाव येथील तीन
जण, वार्ड क्र. समता नगर सेनगाव येथील एक जण , स्वानंद कॉलनी वसमत येथील एक जण,
आखाडा बाळापूर येथील तीन जण, कांडली कळमनुरी येथील दोन जण आणि रेडगांव कळमनुरी येथील एक जण असे एकुण 23
जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे.
तसेच आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगाली
येथील 4 तर कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत 7 असे एकूण 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती
असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 4 रुग्णांची
प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 410 रुग्ण
झाले आहेत. त्यापैकी 310 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 100 रुग्णांवर उपचार चालू आहेत.****
No comments:
Post a Comment