विविध क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन
केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी
विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे
आवाहन
हिंगोली, दि.23: जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध
क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन केलेल्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी विशेष गौरव
पुरस्कार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून करण्यात
आले आहे. यामध्ये खेळ, साहित्य, संगीत,
गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी
उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे माजी सैनिक, पत्नी,
पाल्य आणि शैक्षणिक वर्षे 2019-20 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डात 95% पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा
पदव्युत्तर परीक्षेत विद्यापिठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम
व एम्स अशा नामवंत संस्थेमध्ये प्रवेश मिळविलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना सैनिक
कल्याण विभागामार्फत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष
गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र असलेल्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी दि. 16 सप्टेंबर, 2020
पूर्वी संपर्क साधावा. तसेच येतांना सोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, चालू वर्षी
शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, इयत्ता 10/12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या
गुणपत्रिकेची छायांकित प्रत, डिस्जार्च पुस्तकात कुटूंबाची नांवे असलेल्या पानाची
छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयीकृत बँक
पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर
क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र इत्यादी आणावे.
या
विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी आपले अर्ज सादर
करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment