जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 11 रुग्ण
·
जिल्ह्यात
81 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,
दि.16: जिल्हा रुग्णालय, हिंगोली
यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 11 नवीन कोविड-19 चे रुग्ण
आढळून आले आहेत. कोरोना केअर सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी
दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
हिंगोली पोस्ट
ऑफीस जवळ, नवा मोंढा येथील 77 वर्षीय पुरुष, कासारवाडा येथील 65 वर्षीय पुरुष आणि आझम
कॉलनीतील 58 वर्षीय पुरुष तर वसमत येथील ब्राह्मण गल्लीतील 45 वर्षीय पुरुष, गुलशन
नगर येथील 32 वर्षीय महिला, जुमा पेठ येथील 63 वर्षीय पुरुष, सम्राट कॉलनीतील 40 वर्षीय
महिला आणि स्टेशन रोड येथील 15 वर्षीय
मुलगा तसेच हिंगोली तालूक्यातील पेडगाव येथील 3 व्यक्ति असे एकुण 11 जणांना कोविड-19
ची लागण झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती
असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 2 रुग्णांची
प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तसेच 2 रुग्णांची
प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे
4 कोविड-19 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 373 रुग्ण झाले
आहेत. त्यापैकी 292 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर
आज घडीला जिल्ह्यात एकूण 81 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
****
No comments:
Post a Comment