10 July, 2020

जिल्ह्यात नवीन 2 रुग्ण ; तर 8 रुग्णांना डिस्चार्ज · 45 रुग्णांवर उपचार सुरु

जिल्ह्यात नवीन 2 रुग्ण ; तर 8 रुग्णांना डिस्चार्ज

·        45 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, दि.10: आज रोजी प्राप्त अहवालानुसार आयसोलेशन वार्ड जिल्हा रुग्णालय हिंगोली अंतर्गत एक 43 वर्षीय पुरुष जो गांधी चौक हिंगोली येथील नातेवाईकांकडे आला आहे, त्याला कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील रुग्ण हा हैद्राबाद मधून हिंगोली येथे आला आहे.

आज रोजी क्वारंटाईन सेंटर वसमत अंतर्गत (गावपातळीवरील) एका 25 वर्षीय पुरुष्ज्ञ राहणार वापटी गाव तालुका वसमत याला कोविड-19 ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सदरील युवक हा मुंबई मधून वसमत येथे आला आहे.

आज रोजी कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत 3 कोविड-19 रुग्ण  (1 तालाबकट्टा, 2 केंद्रा बुद्रुक ) हे बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आला आहे. आज रोजी कोरोना केअर सेंटर औंढा नागनाथ अंतर्गत 4 कोविड-19 रुग्ण (2 औंढा नागनाथ, 2 भोसी) हे बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आला आहे.

आज रोजी कोरोना केअर सेंटर वसमत अंतर्गत 1 कोविड-19 रुग्ण (वसमत शहर) हा बरा झाल्यामुळे त्याला डिस्चार्ज करण्यात आला आहे.आज रोजी एकूण 8 कोविड-19 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आला आहे व 2 नवीन कोविड-19 रुग्ण आढळून आले आहेत.

आज पर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण  316 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 271 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकूण 45 रुग्णांवर उपचार चालू आहेत.

आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे 11 कोविड-19 रुग्ण (1 रिसाला बाजार, 1 मकोडी, 2 बहिर्जी नगर, 3 गांधी चौक, 1 जी. एम.सी. नांदेड, 1 पेडगाव , 2 शुक्रवार पेठ).

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये 9 कोविड-19 रुग्ण (2 बहिर्जी नगर, 1 गणेश नगर, 1 दर्गापेठ, 1 रिधोरा, 2 टाकळगाव, 1 जय नगर, 1 वापटी) येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकूण 8 कोविड-19 रुग्ण (1 बाभळी, 2 विकास नगर, 3 नवी चिखली, 1 डिग्रस, 1 शेवाळा) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.

कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत 12 कोविड-19 चे रुग्ण (2 तालाबकट्टा, 1 प्रगती नगर हिंगोली, 3 भांडेगाव, 1 पिंपळखुटा, 1 हनवतखेडा, 4 कळमकोंडा) उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून सद्य:स्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.

कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे 3 कोविड-19 चे रुग्ण (1 केंद्रा बु., 2 वैतागवाडी) उपचारासाठी भरती आहेत.

क्वारंटाईन सेंटर औंढा नागनाथ येथे कोविड-19 रुग्ण (2 दौडगाव) उपचारासाठी भरती आहेत.

जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटर अंतर्गत एकूण 5506 व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 5030 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 4772 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीला 726 व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी 192 अहवाल येणे/ थ्रोट स्वॅब घेणे प्रलंबित आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाचे विकार, कॅन्सर इ. दुर्धर आजार आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच काही त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्र (सामुदाय आरोग्य अधिकारी मार्फत), प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करुन घ्यावी तसेच अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबून मोलाचे सहकार्य करावे, तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईल वर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणांस सदरील ॲप सतर्क करण्यास मदत करते.

****


No comments: