कोविड-19 चे जिल्ह्यात नवीन 54 रुग्ण
·
167
रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.24: जिल्ह्यात 54 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
यामध्ये
अँटीजन टेस्टद्वारे तोफखाना 12 व्यक्ती, मंगळवारा 10 व्यक्ती, तलाबकट्टा 4
व्यक्ती, आझम कॉलनी 12 व्यक्ती, पेंन्शनपुरा 5 व्यक्ती असे एकूण 43 जण तर इतर 11
व्यक्तींचा समावेश असून असे एकुण 54 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल
प्राप्त झाला आहे.
तसेच
कोरोना केअर सेंटर, वसमत अंतर्गत 6 व जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथील 1
रुग्ण असे एकूण 7 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या कोविड-19
रुग्णांपैकी 13 रुग्णांची प्रकृती गंभीर
असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 506 रुग्ण झाले असून त्यापैकी 334 रुग्ण बरे झाल्याने
त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 167 रुग्णांवर
उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 5 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment