शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे
-जिल्हा उपनिबंधक
हिंगोली, दि.10 : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत
ऑनलाईन पोर्टलवर पात्र शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यानुसार CSC
सेंटर व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिध्द झालेल्या यादीतील शेतकरी त्यांचे आधार
प्रमाणिकरण करुन घेवून योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु ज्या शेतक-यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणिकरण केलेले
नाही. अशा शेतक-यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे नजिकच्या CSC सेंटरवर
किंवा त्यांचे संबंधीत बँक शाखेस तात्काळ संपर्क करुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन
घ्यावे. म्हणजे प्रसिध्द झालेल्या यादीतील सर्व शेतक-यांना संबंधीत बँकांमार्फत कर्जमुक्ती
रकमांचा त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही करुन सदर योजना पूर्ण केली जाईल व पुढील विस्तारीत
कर्जमुक्ती योजना सुरु करण्यास अधिक विलंब होणार नाही. तसेच सदर योजनेच्या मुख्य उददेशानुसार
योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पीक कर्ज घेण्यासाठी पात्र
ठरणार आहेत. असे आवाहन मा. जिल्हाधिकारी, हिंगोली आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
हिंगोली यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजना 2019 मधील पोर्टलवर प्राप्त झालेली विशिष्ट क्रमांकाची शेतक-यांची कर्ज खाती संख्या माहिती |
||||||
अ.क्र. |
तालुका |
जिल्हा पोर्टलवर प्राप्त पहिली यादी
दि.24.02.2020 मधील शेतकरी कर्ज खाती संख्या ( पायलट यादी ) |
जिल्हा पोर्टलवर प्राप्त दुसरी यादी
दि.28.02.2020 मधील शेतकरी कर्ज खाती संख्या |
जिल्हा पोर्टलवर प्राप्त तिसरी यादी दि.27.04.2020 मधील शेतकरी कर्ज खाती संख्या |
जिल्हा पोर्टलवर प्राप्त चौथी यादी दि.18.05.2020 मधील शेतकरी कर्ज खाती संख्या |
एकुण प्राप्त झालेल्या यादीतील शेतकरी कर्ज खाती
संख्या |
1 |
हिंगोली |
233 |
16016 |
2282 |
522 |
19053 |
2 |
वसमत |
--- |
16140 |
3835 |
450 |
20425 |
3 |
कळमनुरी |
-- |
14902 |
1601 |
528 |
17031 |
4 |
औढा ना |
-- |
11709 |
2424 |
457 |
14590 |
5 |
सेनगाव |
-- |
13539 |
2979 |
266 |
16784 |
एकुण हिंगोली जिल्हा |
233 |
72306 |
13121 |
2223 |
87883 |
असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
हिंगोली यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment