जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 28 रुग्ण
·
जिल्ह्यात
74 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,
दि.14: जिल्हा रुग्णालय, हिंगोली
यांच्याकडून आज रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 28 नवीन कोविड-19 चे
रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना केअर सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी
दिलेल्या माहितीनुसार त्यांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे.
यामध्ये हिंगोली येथील पेन्शनपुरा, गोदावरी हॉटेलजवळ 1
रुग्ण आणि औंढा तालूक्यातील अंजनवाडी 1 रुग्ण जे सारीच्या आजाराने जिल्हा
रुग्णालय, हिंगोली येथे भरती आहेत. हिंगोली तालूक्यातील पेडगांव येथील 11 रुग्ण,
रामा देऊळगाव येथील 5 रुग्ण, पहेणी येथील 2 रुग्ण, माळधामणी येथील 1 रुग्ण आणि
जयपूरवाडी येथील 1 रुगण तसेच सेनगाव येथील 1 रुग्ण, वसमत येथील सम्राट कॉलनी,
स्टेशन रोड, आणि गणेशपेठ 5 रुग्ण असे एकुण 28 जणांना कोविड-19 ची लागण झाली आहे.
आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे
भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 4 रुग्णांची
प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तसेच 2 रुग्णांची
प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे
6 कोविड-19 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 361 रुग्ण झाले
आहेत. त्यापैकी 287 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर
आज घडीला जिल्ह्यात एकूण 74 रुग्णांवर उपचार चालू आहेत.
****
No comments:
Post a Comment