हिंगोली, दि.28: जिल्ह्यात 17 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 06 रुग्ण बरे
झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी
माहिती दिली आहे.
नव्याने आडळूण आलेल्या रुग्णांमध्ये गाडीपुरा, हिंगोली येथील 03
व्यक्ती, मेहराज कॉर्नर हिंगोली येथील 01 व्यक्ती, आझम कॉलनी हिंगोली येथील 1
व्यक्ती, मंगळवारा, हिंगोली येथील 03 व्यक्ती, एस.आर.पी.एफ. हिंगोली येथील 04
व्यक्ती, श्रीनगर वसमत येथील 03 व्यक्ती, सोमवार
पेठ, वसमत येथील 01 व्यक्ती आणि पठाण
मोहल्ला वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 17 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा
अहवाल प्राप्त झाला आहे.
तर बरे झालेले रुग्णांमध्ये अंजनवाडी येथील 01, शुक्रवारपेठ वसमत
येथील-04 व नारायण नगर हिंगोली येथील 01 असे
एकूण 06 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 575 रुग्ण झाले असून
त्यापैकी 372 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला
जिल्ह्यात एकूण 197 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 6 व्यक्तीचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment