15 July, 2020

कोरोना विरुध्दच्या लढाईत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचा सहभाग


हिंगोली,दि.15: कोविड-19 कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग हिंगोली यांच्या मार्फत महत्वाची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या लोकांकरीता विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले होते. सदर विलगीकरण कक्षामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या पत्रान्वये कोविड-19 च्या रुग्णांना सेवा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष काम वाटप समिती हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोना केअर सेंटर वसमत, कोरोना केअर सेंटर औंढा (ना.) कोरोना केअर सेंटर कळमनुरी, कोरोना केअर सेंटर सेनगाव, कोरोना केअर सेंटर हिंगोली  डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल औंढा रोड, हिंगोली, जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली या एकूण सात कोरोना केअर सेंटरला सेवा देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना एकूण सात सेवा सोसायट्यांना काम वाटप करण्यात आले. एकूण 67 बेरोजगार सोसायट्यांपैकी कार्यरत 49 सेवा सोसायटी आहेत. तर सेवा सोसायट्यांना माहे ऑगस्ट-2019 पासून ते आजपर्यंत एकून 27 लाख 48 हजार 228 रुपये रक्कमेचे काम वाटप करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

*****


No comments: