बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वितरीत करावे
- पालकमंत्री प्रा. वर्षाताई
गायकवाड
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात
आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा. गायकवाड या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी
शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
यावेळी बॅंकांनी
शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पिक कर्ज वितरीत केले आहे का ? किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा
लाभ मिळाला असून, किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याची यावेळी माहिती घेत
पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरिप हंगाम सुरु होवून महिना झाला आहे
तरी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 18 टक्केच शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झाले आहे.
बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत
आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत
टाळा-टाळ किंवा दिरंगाई करत आहे अशा सर्व बॅंकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना
पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बॅंक निहाय आराखडा तयार करावा. तसेच त्यांना तात्काळ पिक
कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपूरावा करावा. जिल्ह्याकरीता किती
बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. तसेच किती शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले
बी-बियाणे आणि खत उपलब्ध करून दिले. तसेच पेरलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे
उगवल्या नसल्याच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या असून किती गुन्हे दाखल करण्यात आले
आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्याचा पंचनामा करावा. तसेच दोषीवर कायदेशीर
कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यांना
रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत असे निर्देश पालकमंत्री प्रा. गायकवाड
यांनी यावेळी दिले.
पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी
कृषि, सहकार, रेशीम आणि रोजगार हमी योजना विभागाचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे
विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment