हिंगोली नगर परिषद हद्दीतील बाजारपेठाकरीता वेळापत्रक निश्चित
हिंगोली, दि.10 : हिंगोली नगर परिषद भाग 5
ते 10 जुलै या कालावधीत पूर्णत: बंद करुन संचारबंदी करण्यात आली होती. त्यानुसार
दि 10 जुलै, 2020 रोजी संचारबंदी कालावधी संपत असून दि. 11 जुलै, 2020 पासून
शहरातील बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे बाजाराच्या वेळापत्रकाप्रमाणे बाजार
चालू केल्यास नागरिकांची गर्दी कमी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य असल्याने
बाजाराच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.
दिनांक 11 जुलै-भाजीपाला, फळे सकाळी 06.00 ते 11.00, 12 जुलै रोजी
किराणा दुकान सकाळी 08.00 ते दुपारी 01.00, 13 जुलै रोजी स्टेशनरी, कापड,
इलेक्ट्रॉनिक इत्यादी सकाळी 10.00 ते दुपारी 01.00, 14 जुलै रोजी भाजीपाला, फळे,
सकाळी 06.00 ते 11.00, 15 जुलै रोजी किराणा दुकान सकाळी 08 ते दुपारी 01.00, 16
जुलै रोजी स्टेशनरी, कापड, इलेक्ट्रॉनिक इत्यादी सकाळी 10.00 ते दुपारी 01.00 आणि
17 जुलै रोजी भाजीपाला व किराणा दुकाने सकाळी 06.00 ते सकाळी 11.00 पर्यंत.
बाजाराच्या
वेळेत बदल करण्यात आल्यानुसार नागरिकांनी तसेच संबंधित आस्थापना मालकांनी दिनांक 11
ते 17 जुलै पर्यंत या वेळापत्रकाचे पालन करावे, दिनांक 18 जुलैपासून सर्व बाजार
पेठ पूर्ववत चालू राहतील. त्यानुसार हे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. या
आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188
अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005,
साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत
संबंधितांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची
जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी, कळमनुरी, तहसीलदार कळमनुरी,
मुख्याधिकारी नगर परिषद, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी,
कर्मचारी यांची असेल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे
अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment