07 July, 2020

पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा




पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा

 

           हिंगोली, दि.7: राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या गुरुवार, दि. 9 जुलै,2020 रोजी दुपारी 02.30 वाजता मुंबई येथून नांदेड येथील विमानतळ येथे आगमन होणार आहे. तसेच सोयीनुसार नांदेड येथून वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण करतील. हिंगोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे मुक्काम करतील.

तसेच शुक्रवार, दि. 10 जुलै,2020 रोजी, सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे विविध विषयांवर आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 02.00 वाजता विविध ठिकाणी स्थळ पाहणी व भेट देतील. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे मुक्काम करतील.

शनिवार, दि. 11 जुलै, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली सभागृह येथे विविध विषयांवर आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 01.00 ते 02.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 02.00 वाजता विविध ठिकाणी स्थळ पाहणी व भेटी, शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे मुक्काम करतील.

रविवार, दि. 12 जुलै, 2020 रोजी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड या शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून सोईनुसार मुंबईकडे प्रयाण करतील.  

 

****

 

 


No comments: