हिंगोली
शहरातील काही भाग तसेच गोरेगाव कंटेनमेंट झोन घोषित
· सेनगाव तालुक्यातील प्रभाग क्र. 1 व 10 मधील काही भाग प्रतिबंध मुक्त
हिंगोली,दि.3: हिंगोली शहरातील माहेश्वरी भवन ते जमादर
विहिर, सत्यनारायण गणपती मंदिरापर्यंतचा परिसर, तर सेनगांव तालुक्यातील गोरेगांव
येथील वार्ड क्र. 01, 04, 05 व 06 याठिकाणी कोविड-19 चे
रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी सर्व भाग/गावचे
संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. प्रशासनामार्फत
या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व
आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा
नगर परिषद मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
या आदेशाचे
उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व
साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
सेनगाव तालुक्यातील
प्रभाग क्र. 01 बालाजी नगर व प्रभाग क्र. 10 समता नगर प्रतिबंध मुक्त
सेनगाव
तालुक्यातील प्रभाग क्र. 01 बालाजी नगर व प्रभाग क्र. 10 समता नगर येथे कंटेनमेंट
झोन घोषित करण्यात आला होता. त्याचा कालावधी संपुष्टात आल्याने सदर परिसर आता
प्रतिबंध मुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment