27 August, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण; तर 37 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 155 रुग्णांवर उपचार सुरु तर एक जणांचा मृत्यू

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण; तर 37 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  155 रुग्णांवर उपचार सुरु तर एक जणांचा मृत्यू

        हिंगोली,दि.27: जिल्ह्यात आज 7 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्ट द्वारे कळमनुरी परिसर 1 व्यक्ती, तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे कळमनुरी परिसर 3 व्यक्ती आणि वसमत परिसर 3 व्यक्ती असे एकूण 7 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 37 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एका 55 वर्षीय पुरुषाचा कोविड-19 मुळे आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 12 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 3 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 15 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 369 रुग्ण झाले असून, त्यापैकी 01 हजार 196 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 155 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 18 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

****

 

 

 

 

No comments: