20 August, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 36 रुग्ण; तर 19 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 381 रुग्णांवर उपचार सुरु

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 36 रुग्ण; तर 19 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  381 रुग्णांवर उपचार सुरु  

 

        हिंगोली,दि.20 : जिल्ह्यात आज 36 नवीन कोविड-19 च्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार औंढा परिसरातील 16 व्यक्ती, कळमनुरी परिसरातील 2 व्यक्ती, वसमत मधील  3 व्यक्ती असे एकुण 21 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे.  तर वसमत परिसर 9 व्यक्ती, कळमनुरी परिसर 6 व्यक्ती असे एकूण 15 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  तसेच आज 19 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 9 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 2 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 11 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 230 रुग्ण झाले असून, त्यापैकी 835 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 381 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 14 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

****

 

 

 

No comments: