08 August, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण तर 43 रुग्णांना डिस्चार्ज · 200 रुग्णांवर उपचार सुरु व आज एका रुग्णाचा मृत्यू

 

  जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 7 रुग्ण तर 43 रुग्णांना डिस्चार्ज

·  200 रुग्णांवर उपचार सुरु व आज एका रुग्णाचा मृत्यू

        हिंगोली, दि.8: जिल्ह्यात 7 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची व आज एका 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

            सेनगाव 2 व्यक्ती, वटकळी 1 व्यक्ती असे 3 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे तर ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत 1 व्यक्ती, कौठारोड वसमत 1 व्यक्ती, शास्त्री नगर वसमत 1 व्यक्ती, औंढा शहर 1 व्यक्ती असे 4 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर 43 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

            जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 2 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 10 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 815 रुग्ण झाले असून, त्यापैकी 606 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 200 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 9 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

00000

No comments: