17 August, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 44 रुग्ण; तर 37 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 377 रुग्णांवर उपचार सुरु

 

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 44 रुग्ण; तर 37 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

·  377 रुग्णांवर उपचार सुरु  

 

        हिंगोली,दि.17: जिल्ह्यात आज 44 नवीन कोविड-19 चे रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली परिसरातील 20 व्यक्ती, कळमनुरी परिसरातील 4 व्यक्ती, सेनगाव ग्रामीण मधील  5 व्यक्ती असे एकुण 29 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आले आहे. तर हिंगोली येथील 4 व्यक्ती, कोथळज ता. हिंगोली 4 व्यक्ती, घोटादेवी हिंगोली 1 व्यक्ती, इंचा 1 व्यक्ती, लिंबाळा ता. हिंगोली 1 व्यक्ती, पिंपळखुटा ता. हिंगोली येथील 4 व्यक्ती असे एकूण 15 व्यक्ती आरटीपीसीआर टेस्टद्वारे कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  तसेच आज 37 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 9 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 3 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

            जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 1 हजार 178 रुग्ण झाले असून, त्यापैकी 789 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 377 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 12 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

****

 

 

 

No comments: