औरंगाबाद येथील वेतन पडताळणी पथकाकडे
पडताळणीसाठी
पाठविण्यात आलेली सेवापुस्तके
घेऊन जाण्याचे आवाहन
हिंगोली,दि.19 : जिल्ह्यातील
सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातून ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची
सेवापुस्तके लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, औरंगाबाद यांच्याकडे सादर करण्यात आली होती.
त्या संबंधीत अधिकारी-कर्मचारी यांनी आपली सेवापुस्तके घेवून जाण्यासाठी त्यांनी आपल्या
कार्यालयातील जबाबदार कर्मचाऱ्यांस प्राधिकृत करावे. तसेच प्राधिकृत करण्यात आलेल्या
कर्मचाऱ्यासोबत संबंधितास प्राधिकृत केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे पत्र संबंधिताच्या
नमुना स्वाक्षरी व कार्यालयाच्या ओळखपत्रासह व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, औरंगाबाद
यांना ज्या पत्रान्वये सेवापुस्तक सादर केले होते त्या पत्राच्या मूळ प्रतीसह एक छायांकित
प्रत (वेतनिका प्रणालीमधून निर्गमित केलेले) सादर करावी. जेणेकरुन मूळ सेवापुस्तक आपल्या
कार्यालयास हस्तांतरीत करणे सोयीचे होईल, असे आवाहन पी. डी. पुंडगे, कोषागार अधिकारी,
हिंगोली यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment