25 August, 2020

10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन समुपदेशन व करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या

संधीबाबत ऑनलाईन समुपदेशन व करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 

        हिंगोली,दि.25: जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या वतीने इयत्ता 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या संधीबाबत ऑनलाईन समुपदेशन व करियर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र दि. 29 ऑगस्ट, 2020 रोजी दुपारी 01:00 वाजता google meet वर Meeting https://meet.google.com/tvj-kdjn-kcx या लिंकवर आयोजीत करण्यात आले आहे.

            ऑनलाईन समुपदेशन व करिअर मार्गदर्शन सत्रामध्ये 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना आयटीआय मधील रोजगाराच्या संधी या विषयावर अजय भुसारे, शिल्पनिदेशक (कोपा), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिंगोली हे समुपदेशन व मार्गदर्शन करणार आहेत. वेबिनारबाबत काही अडचण आल्यास (02456) 224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

            त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी सद्यस्थिती लक्षात घेता ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे मोफत/विनाशुल्क  सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

****

No comments: