हिंगोली,दि.20: माजी
पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त येथील जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात ‘सद्भावना दिन’ साजरा करण्यात आला. सद्भावना दिनानिमित्त अप्पर
जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व
कर्मचारी यांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी
चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसिलदार गजानन शिंदे
यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी यांची
उपस्थिती होती.
*****
No comments:
Post a Comment