पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली दौरा
हिंगोली,दि.12: राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षा
गायकवाड यांचे गुरुवार, दि. 13 ऑगस्ट,2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता
शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन होणार आहे.
तसेच शुक्रवार,
दि. 14 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता कोविड-19 आढावा बैठक, पीक कर्ज वाटप
आढावा बैठक, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे पंचनामेबाबत बैठकीस
उपस्थित राहणार आहे. तसेच दुपारी 3.00 वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विविध
भागांची पाहणी करणार आहे.
शनिवार, दि. 15
ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे ध्वजारोहण
कार्यक्रमास उपस्थित राहणार असुन सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली
येथून मोटारीने वाशिमकडे प्रयाण करतील.
****
No comments:
Post a Comment