जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 20 रुग्ण तर
11 रुग्णांना डिस्चार्ज
· 180
रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली, दि.6: जिल्ह्यात 20 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
फलटन
6 व्यक्ती, रामाकृष्णा सिटी 1 व्यक्ती, विवेकानंद नगर 3 व्यक्ती, शेवाळा ता.
कळमनुरी 1 व्यक्ती, ब्राह्मण गल्ली कळमनुरी 1 असे 12 रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन
टेस्टद्वारे तर रिसाला बाजार 1 व्यक्ती,
मेहराज कॉर्नर 2 व्यक्ती, पोस्ट ऑफीस रोड 2 व्यक्ती, शिवाजी नगर 1 व्यक्ती, फलटन 2
व्यक्ती असे 8 रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर 11 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा
सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 7
रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना
ऑक्सीजन चालू आहे. तर 5 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना
बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 12 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती
चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 738 रुग्ण झाले असून, त्यापैकी 550 रुग्ण बरे झाल्याने
त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 180 रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 8 व्यक्तीचा मृत्यू झाला
असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment