जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 25 रुग्ण तर
16 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
· 209
रुग्णांवर उपचार सुरु
·
हिंगोली, दि.9: जिल्ह्यात 25 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असल्याची
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.
विद्यानगर
कळमनुरी 1 व्यक्ती, इंदिरा नगर कळमनुरी 1 व्यक्ती, औंढा नागनाथ 1 व्यक्ती असे 3
रुग्ण हे रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे तर जि.रु.
हिंगोली 2 व्यक्ती, पोस्ट ऑफीस रोड 1 व्यक्ती, सरस्वती नगर 1 व्यक्ती, फलटन 1
व्यक्ती, गंगानगर 1 व्यक्ती, पेन्शनपुरा 1 व्यक्ती, तालबाकट्टा 1 व्यक्ती,
गणेशवाडी 1 व्यक्ती, जिल्हा परिषद
क्वॉर्टर 3 व्यक्ती, राहोली ता. हिंगोली 1 व्यक्ती, इडोळी ता. हिंगोली 1 व्यक्ती,
देऊळगावरामा ता. औंढा 1 व्यक्ती, वसमत नगर 2 व्यक्ती, बँक कॉलनी वसमत 1 व्यक्ती,
सहारापेठ वसमत 1 व्यक्ती, मदिना नगर कळमनुरी 1 व्यक्ती, औंढा शहर 2 व्यक्ती असे 22
रुग्ण आरटीपीसीआर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. तर 16 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने
त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा
सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 8
रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना
ऑक्सीजन चालू आहे. तर 2 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना
बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 10 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती
चिंताजनक असून तज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 840 रुग्ण झाले असून, त्यापैकी 622 रुग्ण बरे झाल्याने
त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 209 रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 9 व्यक्तीचा मृत्यू झाला
असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment