आजपासून
बँकांची विड्रॉल सुविधा पूर्ववत सुरु
हिंगोली,दि.24: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील बँकांची
विड्रॉल (पैसे काढण्याची सुविधा) सुविधा जिल्हा प्रशासनामार्फत बंद करण्यात आली
होती. परंतू आजपासून (मंगळवार दि. 25 ऑगस्ट, 2020) जिल्ह्यातील सर्व बँकांची
विड्रॉल सुविधा हि पूर्ववत सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हा अग्रणी बँक व सर्व बँकांचे व्यवस्थापक यांनी दिलेल्या
सूचनेनुसार बँक परिसरात सर्व संबंधितांना आणि नागरिकांना सामाजिक अंतरांचे पालन
करणे तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.
तथापी
या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम
188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येणार असून आपत्ती
व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार संबंधीतांवर कारवाई
करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment