19 August, 2020

निवृत्ती वेतन धारकांना माहिती सादर करण्याचे आवाहन

 

निवृत्ती वेतन धारकांना माहिती सादर करण्याचे आवाहन

 

        हिंगोली,दि.19: जिल्हा कोषागार कार्यालय,हिंगोली येथून घेत असलेले निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धारकाची माहिती निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची  आहे. त्यासाठी निवृत्ती वेतन धारकांचे, कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे पूर्ण नाव व पूर्ण पत्ता, पिपिओ क्रमांक, बँकेचा तपशील जसे बँकेचे नाव, शाखेचे नाव व खाते क्रमांक, पॅन कार्ड (झेरॉक्स प्रत जोडावी), मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी असल्यास ही मुद्देनिहाय माहिती दिनांक 15 सप्टेंबर, 2020 पर्यंत to.hingoli@zillamahakosh  या ई-मेल आयडी वरच संबंधीतांनी पाठवावी.

याकरीता साठी कार्यालयात येण्याची गरज नसून सद र माहिती ई-मेल द्वारे पाठविण्यात यावी अथवा जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली यावर पत्र व्यवहार करावा. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

****

 

No comments: