22 August, 2020

सणासुदीच्या काळात अन्न पदार्थाचा दर्जा उत्तम राखण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

 


        हिंगोली, दि.22: दिनांक 20 ऑगस्ट, 2020 रोजी अन्न व औषण प्रशासन कार्यालय परभणी यांनी औरंगाबाद विभागाचे सह आयुक्त उ. शं. वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त नारायण सरकटे यांच्या नेतृत्वात  औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील मे. नागेश्वर ऑईल इंडस्ट्रीज या आस्थापनेची तपासणी केली असता या आस्थापनेत खाद्य तेल पॅकींग करण्यासाठी रियुज टिन वापरत असल्याचे आढळून आले. तसेच सदर आस्थापनेत मुदतबाह्य  परवाना क्रमांक असलेले रिफाईंड सोयाबीन ऑईल हा अन्न पदार्थ आढळून आले. या अनुषंगाने रिफाईंड सोयाबीन ऑईल, रिफाईंड पामोलिन ऑईल, रिफाईंड सोयाबीन ऑईल (सोया डिलक्स्) या अन्न पदार्थाचे नमुने  विश्लेषणास्तव घेण्यात येऊन उर्वरित एकूण  दहा लाख एकोनव्व्द हजार एकशे तेरा रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यात आला. यामुद्देमालात रिफाईंड सोयाबीन ऑईल 5 हजार लिटर, रिफाईंड पामोलिन ऑईल 3 हजार लिटर, रिफाईंड सोयाबीन ऑईल (सोया डिलक्स्) 237 टीन, रियुजड टीन एम्पटी कॅन 1100 आदि समावेशीत आहे.

अन्न व सुरक्षा व माणदे कायदा 2006 व नियम व नियमन 2011 कायद्यातील तरतुदींचे पालन करावे व सणासुदीच्या अनुषंगे अन्न पदार्थांचा दर्जा उत्तम राखावा अन्यथा सदर कायद्याच्य अनुषंगे कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले आहे.

0000

 

No comments: