31 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

 

     हिंगोली, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 52 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 653 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 



जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

 

        हिंगोली, (जिमाका) दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी  राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकात्मतेची शपथ देण्यात आली.  

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

****

29 October, 2021

 

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विविध घरकुल योजनेतील

एक हजार लाभार्थ्यांचे गृह प्रवेश

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : दसरा व दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एक हजार घरांचे बांधकाम पूर्ण करुन गृहप्रवेश कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी संजय दैने आणि प्रकल्प संचालक निलेश कानवडे यांनी तालुकास्तरावर घरकुलांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातून एक हजार पेक्षा जास्त घरकूल पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे वेळेत गृह बांधणीचे काम पूर्ण करणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. पूर्णत्वास आलेल्या घरकुल लाभार्थ्यांची दसरा व दिवाळी नवीन घरात आनंदात साजरी व्हावी, यासाठी गृह प्रवेश कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रातिनिधिक स्वरुपात सर्व तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतीमध्ये अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने दिवाळीपूर्वी गृहप्रवेश कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) तसेच राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांमध्ये 01 जून, 2021 पासून आजपर्यंत 783 लाभधारकांचे घरकुल पूर्ण झाले आहेत. विविध घरकुल योजनेत शासनाकडून 01 लाख 20 हजार रुपये तसेच नरेगा योजनेंतर्गत 18 हजार 500 व स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत 12 हजार 500 रुपये असे एकूण 01 लाख 50 हजार एवढे अनुदान लाभधारकांना दिले जाते.

जिल्ह्यात पूर्ण झालेल्या घरकुलामध्ये 01 जून, 2021 पासून आजपर्यंत  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत औंढा नागनाथ -98, वसमत-147, हिंगोली-24, कळमनुरी-115, व सेनगाव-241 असे एकूण 625 घरकुले पूर्ण झाली आहेत. तसेच रमाई व शबरी या राज्य पुरस्कृत योजनेत औंढा नागनाथ-26, वसमत-10, हिंगोली-136, कळमनुरी-40 व सेनगाव-20 असे एकूण 158 घरकुले पूर्ण झाली आहेत. अशा एकूण 783 घरकुले पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे दिवाळीपूर्वी गृहप्रवेश कार्यक्रम जिल्ह्यात सुरु आहेत. तसेच विविध शहरी घरकुल योजनेत औंढा नागनाथ-15, वसमत-10, हिंगोली-136, कळमनुरी-40 व सेनगाव-20 असे एकूण 221 घरकुले पूर्ण झाली असून शहरी व ग्रामीण घरकुले मिळून 01 हजार 4 घरकुले पूर्ण झाली आहेत.

26 जानेवारी, 2022 पर्यंत जिल्ह्यातील वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रकल्प संचालक निलेश कानवडे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.

*******

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन 01 रुग्ण, तर 04 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : जिल्ह्यात 01 नवीन कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला आहे, तर 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपिट अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 01 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 51 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 653 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

28 October, 2021

 

मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन दिपावली उत्सव साजरा करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात  शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  जितेंद्र पापळकर यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन दिपावली उत्सव-2021 साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.      

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे दि. 4 जून, 2021 चे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे दि. 11 ऑगस्ट, 2021 चे आदेश तसेच दि. 24 सप्टेंबर, 2021 च्या आदेशान्वये ‘’ब्रेक द चेन’’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.         

कोविड-19 संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.  

दिपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यांवर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामन्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. 24 सप्टेंबर, 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा.दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबूक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन (सिव्हील अपिल) क्र.728/2015 (निर्णय दि.23.10.2018) तसेच सिव्हील अपिल क्र.2865-2867/2021 (निर्णय दि.23.07.2021) मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशातील सूचनांचे नागरिकांनी, संबंधितांनी तंतोतत पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह हे भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.-न.पं, तसेच संबंधित अधिकारी यांची असेल. 

*******

 

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 03 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 28 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर आज घडीला 03 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 50 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 653 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 03 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या

गट-ड संवर्गाच्या परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गांच्या पदासाठीची परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रावर दि. 31 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.00 ते 05.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी 1) कै. शंकरराव सातव कला व कॉमर्स विद्यालय, कळमनुरी, 2) कै. डॉ. शंकरराव सातव अध्यापक महाविद्यालय कळमनुरी, 3) गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूल कळमनुरी, 4) महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल कळमनुरी, 5) कै. शिवरामजी मोघे सैनिक स्कूल कळमनुरी, 6) गोरखनाथ विद्यालय चौढी आंबा, 7) श्री सिध्देश्वर विद्यालय वसमत, 8) केंब्रीज स्वतंत्र ज्युनियर कॉलेज वसमत,         9) बहिरजी स्मारक विद्यालय वसमत, 10) अहिल्याबाई होळकर कन्या विद्यालय वसमत, 11) महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वसमत, 12) बहिरजी स्मारक महाविद्यालय वसमत, 13) जिल्हा परिषद बहुविद्यालय हिंगोली, 14) सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली, 15) पोदार इंटरनॅशनल स्कूल अकोला रोड हिंगोली, 16) अनुसया विद्यामंदीर खटकाळी बायपास हिंगोली, 17) एबीएम इंग्लीश स्कूल हिंगोली, 18) माणिक मेमोरियल आर्यन स्कूल बस स्टॉप जवळ हिंगोली, 19) श्री शिवाजी कॉलेज हिंगोली, 20) श्रीमती शांतीबाई दराडे हायस्कूल हिंगोली, 21) कै. बाबाराव पाटील कला व सायन्स कॉलेज हिंगोली, 22) गव्हर्नमेंट पॉलटेक्नीक हिंगोली, 23) संत शेठ नामदेव महाराज पठाडे कला व सायन्स कॉलेज हिंगोली, 24) आदर्श एज्यूकेशन सोसायटी कला, कॉमर्स व सायन्स कॉलेज हिंगोली, 25) नागनाथ महाविद्यालय औंढा नागनाथ, 26) नागेश्वर आर्ट ॲन्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय औंढा नागनाथ या 26 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार  आहे.  या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सर्व  परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 ते सायंकाळी  6.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

*****

 

बँकेच्या सिक्युरिटी गार्ड पदासाठी माजी सैनिकांनी अर्ज करावे

 

हिंगोली (जिमाका), दि.28 : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर माजी सैनिकांना सिक्यूरीटी गार्डच्या पदासाठी जाहिरात प्राप्त झाली आहे. यासाठी माजी सैनिकांनी माजी सैनिकाच्या ओळखपत्राची झेरॉक्स, डिस्चार्ज बुक (सेवा पुस्तक) झेरॉक्स, रोजगार कार्ड झेरॉक्स या कागदपत्रासह वैयक्तीक अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे लवकरात लवकर जमा करावे. जेणे करुन आपले नांव पुरस्कृत केले जाईल.

अर्ज दाखल करताना माजी सैनिकांचे वय दि. 01 ऑक्टोबर, 2021 रोजी 45 पेक्षा जास्त नसावे. माजी सैनिकांचे शिक्षण इयत्ता दहावीपेक्षा जास्त नसावे. माजी सैनिक कोणतीही मेडिकल कॅटेगरी नसावी व तो शेप-1 (SHAPE-1)असावा .  

जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी बँकेच्या सिक्युरिटी गार्ड पदासाठी दि. 01 नोव्हेंबर, 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नोंद करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

 

जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

मास्क न वापरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालय प्रमुखांनी दंड आकारावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

      हिंगोली (जिमाका) दि. 28 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सर्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  बाबत जितेंद्र पापळकर यांनी पुढीलप्रमाणे आदेश व सूचना निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आरोग्य विभागाच्या समन्वयाने आयोजित करावे, जेणेकरून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.

सर्व कार्यालये व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधित अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

असे सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी, विभाग प्रमुख, आस्थापना प्रमुख सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षा खाली असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.

मराठी

English

महसूल जमा

(सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल

(एक) सर्वसाधारण सेवा

००७०-इतर प्रशासनिक सेवा

८०० इतर जमा रक्कम

Revenue Receipt

(c) Other non-Tax Revenue

(1) General services

0070-Other Administrative Services

800 Other Receipts

यानुसार वरीलप्रमाणे निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापना येथील प्रमुखांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.

*****

जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

                                                                                          जिल्ह्यात कलम 37 (1)(3) चे आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 10 : जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादूर्भाव, संसर्ग होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त चालू आहे. तसेच दि. 10 व 11 नोव्हेंबर , 2021 रोजी माहेन भागवत, सरसंघचालक (आरएसएस) यांचा दौरा आहे. दि. 14 नोव्हेंबर , 2021 रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी , दि.19 नोव्हेंबर, 2021 रोजी गुरुनानक जयंती आहे.

 तसेच नागरिकांच्या वतीने, विविध संघटना, पक्ष यांच्यातर्फे त्यांच्या मागण्यासाठी मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रकारचे प्रश्न हाताळण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात  दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजीचे 24.00 वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी  आदेश काढले आहेत.

            त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तु जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 

                 


 

अटल बांधकाम कामगार आवास योजनेतील घरकुलाच्या प्रस्तावातील त्रुटीसाठी

अर्जदारांनी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा

हिंगोली (जिमाका), दि.28 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ, मुंबई अंतर्गत हिंगोली येथील सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार यांनी अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांच्याकडे सादर केले होते. हे सर्व प्रस्ताव जिल्ह्यातील त्या-त्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहेत. बांधकाम कामगार अर्जदारांनी सादर केलेल्या प्रस्तावात असलेल्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी त्या-त्या पंचायत समिती स्तरावर संपर्क साधावा.

तसेच नवीन प्रस्ताव सुध्दा पंचायत समिती स्तरावरच सादर करण्यात यावेत, असे आवाहन टी. ई. कराड, सरकारी कामगार अधिकारी तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई जिल्हा हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*****


27 October, 2021

 



स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता

प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागृती

 

हिंगोली (जिमाका), दि.27 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि जायंटस वेलफेअर ग्रुप, हरी ओम योग ग्रुप, योग विद्याधाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा व प्लास्टीक एकत्र करुन नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी नेहरु युवा केंद्राचे अधिकारी आशिष पंत व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्लास्टीकचे गंभीर परिणाम या विषयावर मार्गदर्शन व जनजागृती केली.

याप्रसंगी डॉ. संजय नाकाडे, गोविंद झुनझुनवाला, डॉ. सूर्यकिरण, डॉ.कुमावत, डॉ. श्रीधर कंदी, रत्नाकर महाजन, संजय भन्साळी, संजय उहान, सुदर्शन महाजन, काशिनाथ दराडे, शिवाजी पद्मने तसेच नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

*****

26 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने डिस्चार्ज

04 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 01 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 50 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 652 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

 



कळमनुरी येथे ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी अंगणवाडी सेविका व पोलीस पाटील यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

हिंगोली (जिमाका), दि.26 : ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी कळमनुरी येथे नुकतीच दि. 25 ऑक्टोबर, 2021 रोजी एक दिवशीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा दोन सत्रात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत  संपन्न झाली .

            हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय कळमनुरी येथील भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम   सभागृह  येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कळमनुरी येथील तहसीलदार सुरेखा नांदे ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) श्री. धापसे, कळमनुरीचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धिकी,  पोलीस पाटील श्री. धोडबे हे उपस्थित होते.

            या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कार्यशाळेचा उद्देश या बाबत माहिती दिली तर बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, 2012 व बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006 या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी दिली. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श बद्दलची माहिती समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी दिली. ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन आणि समिती मधील सदस्य यांची भूमिका या बाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण यांनी  दिली. ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांचे कार्य व जबाबदाऱ्या या बद्दल माहिती  बाल सरंक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी दिली. बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी दिली. चित्रफितीचे प्रदर्शन समुपदेशक सचिन पठाडे,  डाटा एंट्री ऑपरेटर राहूल सिरसाट यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी केले तर शेवटी लेखापाल शितल भंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व  कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यशाळेस अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती.

*****

 

25 October, 2021

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात  कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 50 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 651 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******