बॉईज स्पोर्टस कंपनी
प्रवेशासाठी क्रीडा नैपूण्य चाचण्यांचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 05
: आंतरराष्ट्रीय व ऑलंम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या
उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना लहान वयातच
मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देण्यासाठी आर्मी स्पोर्टस् इन्स्टीट्यूट-बॉईज स्पोर्टस
कंपनी पुणे व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने बॉईज स्पोर्टस कंपनीत प्रवेशासाठी
क्रीडा नैपूण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉईज स्पोर्टस कंपनीत प्रवेशासाठी या अगोदर दिलेल्या
दिनांकास काही तांत्रिक अडचण असल्यामुळे चाचण्यांच्या तारखेत बदल करुन आता दि. 8 ते
9 ऑक्टोबर दरम्यान क्रीडा नैपूण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुधारित तारखेनुसार जिल्हा क्रीडा संकुलात दि. 8 ऑक्टोबर,
2021 रोजी सकाळी 11 ते सांय. 4 या वेळेत फक्त मुलांच्या डायव्हिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग,
तलवारबाजी, कुस्ती व वेटलिफ्टींग या खेळांच्या प्रशिक्षणासाठी चाचण्या होणार आहेत.
डायव्हिंग वगळता अन्य खेळांसाठी विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2022 रोजी 10 ते
14 वर्षे असणे आवश्यक आहे. तर डायव्हिंगसाठी वय 8 ते 12 वर्ष असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी
खेळाडूंनी जन्मतारखेचा पुरावा सोबत आणावा. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची विभागीय निवड
चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. तर विभागीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची
राजस्तरीय चाचणीसाठी निवड केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी
व पालकांनी आपल्या खेळाडूंना व मुलांना या चाचणीमध्ये सहभागी करावे, असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
No comments:
Post a Comment