बँकेच्या
सिक्युरिटी गार्ड पदासाठी माजी सैनिकांनी अर्ज करावे
हिंगोली (जिमाका), दि.28 : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर माजी सैनिकांना
सिक्यूरीटी गार्डच्या पदासाठी जाहिरात प्राप्त झाली आहे. यासाठी माजी सैनिकांनी माजी
सैनिकाच्या ओळखपत्राची झेरॉक्स, डिस्चार्ज बुक (सेवा पुस्तक) झेरॉक्स, रोजगार कार्ड
झेरॉक्स या कागदपत्रासह वैयक्तीक अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे लवकरात
लवकर जमा करावे. जेणे करुन आपले नांव पुरस्कृत केले जाईल.
अर्ज दाखल करताना माजी सैनिकांचे वय दि.
01 ऑक्टोबर, 2021 रोजी 45 पेक्षा जास्त नसावे. माजी सैनिकांचे शिक्षण इयत्ता दहावीपेक्षा
जास्त नसावे. माजी सैनिक कोणतीही मेडिकल कॅटेगरी नसावी व तो शेप-1 (SHAPE-1)असावा
.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी बँकेच्या
सिक्युरिटी गार्ड पदासाठी दि. 01 नोव्हेंबर, 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष,
हिंगोली येथे नोंद करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment