28 October, 2021

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या

गट-ड संवर्गाच्या परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

 

हिंगोली (जिमाका), दि. 28 : शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गांच्या पदासाठीची परीक्षा हिंगोली जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रावर दि. 31 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.00 ते 05.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

या कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी 1) कै. शंकरराव सातव कला व कॉमर्स विद्यालय, कळमनुरी, 2) कै. डॉ. शंकरराव सातव अध्यापक महाविद्यालय कळमनुरी, 3) गुलाब नबी आझाद उर्दू हायस्कूल कळमनुरी, 4) महात्मा ज्योतीबा फुले हायस्कूल कळमनुरी, 5) कै. शिवरामजी मोघे सैनिक स्कूल कळमनुरी, 6) गोरखनाथ विद्यालय चौढी आंबा, 7) श्री सिध्देश्वर विद्यालय वसमत, 8) केंब्रीज स्वतंत्र ज्युनियर कॉलेज वसमत,         9) बहिरजी स्मारक विद्यालय वसमत, 10) अहिल्याबाई होळकर कन्या विद्यालय वसमत, 11) महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय वसमत, 12) बहिरजी स्मारक महाविद्यालय वसमत, 13) जिल्हा परिषद बहुविद्यालय हिंगोली, 14) सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय हिंगोली, 15) पोदार इंटरनॅशनल स्कूल अकोला रोड हिंगोली, 16) अनुसया विद्यामंदीर खटकाळी बायपास हिंगोली, 17) एबीएम इंग्लीश स्कूल हिंगोली, 18) माणिक मेमोरियल आर्यन स्कूल बस स्टॉप जवळ हिंगोली, 19) श्री शिवाजी कॉलेज हिंगोली, 20) श्रीमती शांतीबाई दराडे हायस्कूल हिंगोली, 21) कै. बाबाराव पाटील कला व सायन्स कॉलेज हिंगोली, 22) गव्हर्नमेंट पॉलटेक्नीक हिंगोली, 23) संत शेठ नामदेव महाराज पठाडे कला व सायन्स कॉलेज हिंगोली, 24) आदर्श एज्यूकेशन सोसायटी कला, कॉमर्स व सायन्स कॉलेज हिंगोली, 25) नागनाथ महाविद्यालय औंढा नागनाथ, 26) नागेश्वर आर्ट ॲन्ड सायन्स कनिष्ठ महाविद्यालय औंढा नागनाथ या 26 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार  आहे.  या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सर्व  परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 ते सायंकाळी  6.00 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हा दंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

*****

No comments: