जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक
मास्क न वापरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालय
प्रमुखांनी दंड आकारावे
- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश
हिंगोली
(जिमाका) दि. 28 : शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्र
शासनाच्या सर्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय,
निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष बाबत जितेंद्र
पापळकर यांनी पुढीलप्रमाणे आदेश व सूचना निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी
तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व
कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे
बंधनकारक राहील.
जिल्ह्यातील
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी,
कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची
खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी,
कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण
असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन
कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आरोग्य विभागाच्या
समन्वयाने आयोजित करावे, जेणेकरून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल
याची खातरजमा करावी.
सर्व
प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर
तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख,
कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.
सर्व
कार्यालये व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत
असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधित अभ्यागत,
कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या
कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला
अधिकारी) दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.
असे
सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दंड आकारणी
करुन त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी, विभाग प्रमुख, आस्थापना प्रमुख सदर
दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण
व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षा खाली असलेल्या
जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.
मराठी |
English |
महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त
महसूल (एक) सर्वसाधारण सेवा ००७०-इतर प्रशासनिक सेवा ८०० इतर जमा रक्कम |
Revenue Receipt (c) Other non-Tax Revenue (1) General services 0070-Other Administrative Services 800 Other Receipts |
यानुसार वरीलप्रमाणे
निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व शासकीय,
निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापना येथील प्रमुखांची असेल, असेही आदेशात नमूद केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment