12 October, 2021

 जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

02 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, तर 04 रुग्णांवर उपचार सुरु

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात एकही नवीन कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आलेला नाही, तर 02 रुग्ण बरे झाल्याने त्यांना आर्ज डिस्चार्ज देण्यात आहे. तसेच आज 04 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण  16 हजार 42 रुग्ण झाले असून, त्यापैकी  15 हजार 644 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 04 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

*******

No comments: