स्वच्छ
भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची स्वच्छता
प्लास्टीक
मुक्तीसाठी जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि.27 : येथील जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या परिसरात जिल्हा युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि जायंटस
वेलफेअर ग्रुप, हरी ओम योग ग्रुप, योग विद्याधाम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ
भारत अभियानांतर्गत कचरा व प्लास्टीक एकत्र करुन नगर परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून
परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी नेहरु युवा केंद्राचे अधिकारी
आशिष पंत व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्लास्टीकचे गंभीर परिणाम या विषयावर मार्गदर्शन
व जनजागृती केली.
याप्रसंगी डॉ. संजय नाकाडे, गोविंद झुनझुनवाला,
डॉ. सूर्यकिरण, डॉ.कुमावत, डॉ. श्रीधर कंदी, रत्नाकर महाजन, संजय भन्साळी, संजय उहान,
सुदर्शन महाजन, काशिनाथ दराडे, शिवाजी पद्मने तसेच नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय
स्वयंसेवक प्रविण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकंडे व परिसरातील नागरिकांची उपस्थिती
होती.
*****
No comments:
Post a Comment