जिल्हा ग्राम बाल सरंक्षण समितीच्या
सक्षमीकरणासाठी
हिंगोली येथे दोन दिवशीय कार्यशाळा
संपन्न
हिंगोली, (जिमाका) दि. 22 :
जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी कार्यालय हिंगोली अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत ग्राम बाल
संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी हिंगोली
येथे दि. 21 व 22 ऑक्टोबर, 2021 या दोन दिवशीय ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली .
ही प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात आयोजित करण्यात आली
होती.
या कार्यशाळेत प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
सरस्वती कोरडे यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कार्यशाळेचा उद्देश या बाबत माहिती
दिली. तर समुपदेशक सचिन पठाडे यांनी बालविवाह, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श बद्दलची माहिती दिली. बाल संरक्षण
अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे यांनी बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती दिली.
बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे
गठन आणि समिती मधील सदस्य यांची भूमिका याबाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता
रामप्रसाद मुडे यांनी ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे कार्य व जबाबदाऱ्या या
बद्दल माहिती दिली. कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.
अनुराधा पंडीत यांनी बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम,
2012 या
विषयीची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण यांनी बालकांचे हक्क व
अधिकार याविषयीची माहिती दिली. चित्रफितीचे प्रदर्शन रफिक शेख जिलानी,राहूल
सिरसाट, शितल भंडारे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत यांनी केले, तर बाह्य
क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण
कार्यशाळेस अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती
होती.
*****
No comments:
Post a Comment