जिल्ह्यात
कोविड-19 चे नवीन 04 रुग्ण, तर 08 रुग्णांवर उपचार सुरु
हिंगोली,
(जिमाका) दि. 14 : जिल्ह्यात 04 नवीन कोविड-19 चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर 08 कोविड-19 पॉझिटिव्ह
रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र
सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज
प्राप्त झालेल्या अहवालानुसार आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 03 व्यक्ती
व कळमनुरी परिसरात 01 व्यक्ती असे एकूण 04 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले
आहेत.
जिल्ह्यात
आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 46
रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 644 रुग्ण
बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 08
कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात
आतापर्यंत 394 व्यक्तींचा
मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले
आहे.
*******
No comments:
Post a Comment