14 October, 2021

 




ज्ञानसंपन्न व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी

वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक

                                                             - अशोक अर्धापूरकर

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 14 : ज्ञानसंपन्न व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक  असल्याचे प्रतिपादन येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष अशोक अर्धापूरकर यांनी केले.

येथील जिल्हा ग्रंथालयात दि. 14 ते 20 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. अर्धापूरकर बोलत होते. या कार्यक्रमास मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह संतोष ससे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक,  मिलींद सोनकांबळे, रा.बा.पुनसे व इतर ग्रंथालय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

भारताचे माजी राष्ट्रपती दिवगंत डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांच्या स्मृती सार्थरीतीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण  करण्यासाठी  आणि विद्यार्थ्यामध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनांची आवड व प्रेरणा निर्माण करणे, वाचनाचे महत्व जाणून घेणे यासाठी दरवर्षी  डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांचा (15ऑक्टोंबर) हा जन्म्‍ादिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे दि. 14 ते 20 ऑक्टोंबर, 2021 या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून या ग्रंथ प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

****

No comments: