19 October, 2021

 

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांचा वारसांना सानुग्रह अनुदान

 

हिंगोली, दि. 19 (जिमाका) :  मा. सर्वोच्च न्यायालयाच्या दि. 30 जून, 2021 च्या आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी दि. 11 सप्टेंबर, 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे.

त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी दि. 12 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या पत्रानुसार निर्देशित केल्यानुसार 50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान वाटपासाठी ‘‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग), पहिला मजला, हिंगोली-431513, संपर्क क्रमांक 02456-222560, 9552932981, ई-मेल : rdc.hingoli123@gmail.com’’ हे सक्षम प्राधिकारी आहेत .

जिल्हाधिकारी, हिंगोली  हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती लवकरच अधिसूचित करण्यात येईल . त्याबाबत  स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

No comments: