लसीकरण मोहिम यशस्वी
करण्यासाठी
पर्यवेक्षणाच्या कार्यक्षेत्रनिहाय 39 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
हिंगोली, (जिमाका) दि. 08 : राज्यात
दि. 16 जानेवारी, 2021 पासून कोविड-19 लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत
18 वर्षावरील एकूण 9.14 कोटी लाभार्थीचे लसीकरण करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत साधारणपणे
65 टक्के लाभार्थींना पहिला डोस व 28 टक्के लाभार्थींना दुसरा डोस देवून संरक्षित करण्यात आले आहे.
हिंगोली
जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 9 लाख 91 हजार 300 इतकी आहे. यापैकी 4 लाख
39 हजार 851 लाभार्थींना देण्यात आला असून त्याची टक्केवारी 45 टक्के आहे. तर 1 लाख
58 हजार 186 लाभार्थींना दुसरा डोस देवून सरंक्षित करण्यात आले आहे. दुसऱ्या डोसच्या
लाभार्थ्यांची टक्केवारी 16 टक्के इतकी आहे. हे काम राज्याच्या व इतर जिल्ह्याच्या
तुलनेत अत्यंत कमी आहे.
या अनुषंगाने
शिल्लक राहिलेल्या 5 लाख 41 हजार 449 लाभार्थीचा पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थीचा
दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत दि. 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर, 2021 या
कालावधीमध्ये विशेष कोविड-19 लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली आहे. यामुळे कोविड-19
च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे.
ही मोहिम
यशस्वी करण्यासाठी व लसीकरण मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षणाचे कार्यक्षेत्रनिहाय
39 अधिकारी, कर्मचारी यांची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नियुक्ती केली आहे.
संबंधित
अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात भेट देवून लसीकरण सत्राचा
दैनंदिन अहवाल विहित प्रपत्रात दररोज आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली कार्यालयास
सादर करावा. या कामी काही निष्काळजीपणा आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत
प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.
******
No comments:
Post a Comment