15 March, 2022

15 वर्षे जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी करण्याचे आवाहन

 

15 वर्षे जुन्या वाहनांची पुर्ननोंदणी करण्याचे आवाहन

 

            हिंगोली, दि.15 (जिमाका) :  मोटार सायकल, खाजगी मोटार कार या वाहनाची वैधता नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे संपले असतील त्यांनी आपली वाहने पुर्ननोंदणी करुन घेण्यात यावेत. यामध्ये मोटार सायकलच्या एमएच 38 ए, एमएच 38 एच, आणि मोटार कार यांच्या एमएच 38 या नोंदणी क्रमांक सिरीजचा समावेश आहे.

तरी सर्व हिंगोली जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सर्व वाहन मालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या वाहनाचा नोंदणी दिनांक तपासून वाहनाची पूर्ननोंदणी करुन घ्यावी.

            वाहनाचे पुर्ननोंदणी करण्याकरिता शासनाकडून केंद्रीय मोटार नियम 2021 नुसार वाहन 15 वर्ष जुन्या परिवहनेतर वाहनाची पुर्ननोंदणी फिसमध्ये 8 पट वाढ होणार आहे. तसेच वाहन पुर्ननोंदणीसाठी उशिर झाल्यास विलंब शुल्क देखील आकारल्या जाणार आहे.

            हा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. तसेच ज्या परिवहन वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राची वैधता समाप्त झालेली आहे किंवा ज्या परिवहन वाहनाचा मोटार वाहन कर, पर्यावरण कर थकीत आहे त्यांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण व वाहनावरील थकीत कराचा तातडीने भरणा करावा.

            या कार्यालयामार्फत वाहन नोंदणीची वैधता संपलेल्या वाहन, योग्यता, प्रमाणपत्र वैधता संपलेल्या आणि थकीत मोटार वाहन, पर्यावरण कर प्रलंबित  असलेल्या  वाहनावर  कार्यवाही करण्याकरिता विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. करिता सर्व वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्राची वैधता संपलेल्या वाहनाची  पुर्ननोंदणी  करुन घेण्यात यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हिंगोली यांनी केले आहे.

000000

No comments: