कोविड-19 महामारीचे दुसरे वर्ष या विषयावर बालकांनी
लेखन व चित्रकलेच्या माध्यमातून सहभागी व्हावे
हिंगोली, (जिमाका) दि. 17 : महाराष्ट्र राज्य
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी सुचित केल्याप्रमाणे बालकांनी, बालकांसाठी
तयार केलेले पहिल्या नियतकालिकाच्या दुसऱ्या अंकासाठी कोविड-19 महामारीचे दुसरे वर्ष
या विषयाबाबत 1) कोविड-19 कालावधीतील अनुभव, आव्हाने व जोखीम
2) कोविड-19 कालावधीतील ऑनलाईन क्लासरुमचे अनुभव 3) कोविड-19 कालावधीत मुलांसाठी शिकण्याचे
चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी विचार 4) कोविड-19 कालावधीबाबत इतर कोणत्याही सुचना
आणि अनुभव या चार विषयावर लेखन अथवा चित्रकलेच्या माध्यमाव्दारे बालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्ली बाल हक्क संरक्षण आयोग
यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
लेखन
साहित्य हे 400 ते 500 शब्द मर्यादेत असावे लेखन साहित्य हे कविता कथा, लेख, निबंध
इत्यादी स्वरुपात असू शकते. हे साहित्य फक्त वर्ड डॉक्युमेंटमध्ये childrenfirst.jocl@gmail.com या ई-मेलवर
सादर करणे आवश्यक आहे. साहित्य अपलोड करण्यासाठी
मुले त्यांच्या शाळेतील शिक्षक, पालक इत्यादींची मदत घेऊ शकतात. लेखन साहित्य
हे मुलांचे स्वत:चे असावे. इतर कोठुनही कॉपी अथवा यापूर्वी कुठे प्रकाशित झालेले नसावे.
लेखन साहित्य हे हिंदी, इग्रजी भाषेत असणे आवश्यक आहे. प्राप्त लेखन साहित्याची एका
पॅनलव्दारे छाननी केली जाईल. जर्नलच्या पुढील अंकात सर्वोत्कृष्ट 06 गोष्टीचे प्रकाशन
केले जाईल. निवडण्यात आलेला लेख हिंदीत असल्यास या साहित्याचे भाषांतर करुन जर्नलच्या
भाषा धोरणानुसार होईल. प्रवेशितांचे नाव, वय, संपर्क क्रमांक हे ई-मेल मध्ये स्पष्टपणे
नमूद करणे आवश्यक आहे. तसेच वाचन साहित्य फाईलला लेखन करणाऱ्यांचे नाव देणे आवश्यक
आहे.
पेंटीगसाठी
मागदर्शक माहिती : मुलांनी चित्रकलेसाठी
A4/A3 आकाराचा पांढरा ड्रॉईंग पेपर आर्ट पेपर वापरणे आवश्यक आहे. पेंटींग ही शाई, वाटर
कलर, ऑईल पेंटीग किंवा इतर कोणत्याही स्वरुपात करता येऊ शकतात. मुले पेटींगचे उच्च
रिझोलेशन स्कॅन केलेले चित्र JPEG स्वरुपात सबमिट करु शकतात. तसेच पेटींग फाईलचे नाव
उमेदवारांच्या नावावर असणे आवश्यक आहे.
DCPCR
कडे त्यांचे कार्य सबमिट करुन मुले सहमत आहेत
की DCPCR जर्नलमध्ये किंवा इतर कोणत्याही प्रकाशनात बालकांचे नाव, वय आणि संस्थेसह
बाल कलाकारांची योग्य पोचपावती देऊन वापरु
शकते.
प्रवेशितांची
वर्गवारी ही वयानुसार केली जाईल. यामध्ये 10 वर्षाच्या आतील प्रवेशित व 11 वर्षे ते
18 वर्षे अशी विभागणी करण्यात येईल. ही सर्व माहिती दि. 31 मार्च, 2022 पर्यंत childrenfirst.jocl@gmail.com या ई-मेलवर
सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
No comments:
Post a Comment