02 March, 2022

 

जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण नाही

25 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज, तर 05 रुग्णांवर उपचार सुरु

 

हिंगोली, (जिमाका) दि. 02 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच आज 25 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक , हिंगोली यांनी दिली आहे.

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 19 हजार 512 रुग्ण झाले असून, त्यापैकी  19 हजार 103 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 05  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 404 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांनी कळविले आहे.

****

No comments: