राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ.किरण जाधव
25
मार्च रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली, (जिमाका) दि. 23 : औरंगाबाद येथील राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त
डॉ. किरण जाधव हे दि. 25 मार्च, 2022 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 25 मार्च, 2022 रोजी दुपारी 2.00
वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता हिंगोली
येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुख आणि जिल्ह्यातील सर्व
राज्य सेवा हमी कायदा अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयाचे जिल्हा प्रमुख यांच्या
बैठकीस उपस्थिती. तसेच आपले सरकार सेवा केंद्रास भेट. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय
वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
No comments:
Post a Comment