सेंद्रीय शेतीमाल
विक्री मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. 17 : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने सेंद्रीय शेतीमाल विक्री मेळावा व परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
दि. 22 व 23 मार्च, 2022 रोजी येथील महावीर भवनात केले आहे.
यामध्ये परंपरागत कृषि विकास योजना, सेंद्रीय शेती अंतर्गत स्थापन
झालेले गटांचे सेंद्रीय शेतीमाल ज्यामध्ये धान्य, दाळ, भाजीपाला , फळे इत्यादी
विक्री करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग
नोंदवावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
*****
No comments:
Post a Comment