शासनाच्या विविध लोक
कल्याणकारी योजनांची कलापथकाद्वारे जनजागृती
- नागरिक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली, दि. 17 (जिमाका) : शासनाने राज्यातील जनतेच्या विकासासाठी दोन वर्षात राबविलेल्या
योजना, उपक्रमांना भारुड, गोंधळ, पोवाडा, शाहिरी, पथनाट्य आदी लोककलेच्या
माध्यमातून शासनाच्या योजनांचा जनजागृती करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारला
दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती
कलापथकाच्या माध्यमातून शासनाच्या योजना साध्या आणि सोप्या भाषेत गोंधळ, लोकगीते,
भारुडे, गवळणी, बतावणी या माध्यमातून जिल्ह्यातील बाजारांची गावे, गर्दीच्या ठिकाणी
शासकीय योजनांची लोककलेच्या सादरीकरणातून माहिती देऊन योजनांचा प्रचार, प्रसार
करण्यात येत आहे. लोककला प्रकारांना नागरिक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत आहे. या माध्यमातून शासनाच्या योजना, उपक्रमांची माहितीही जनतेला होत
आहे.
जयभवानी कला मंडळाचे
नारायण घोंगडे यांनी पारंपारिक गोंधळाच्या माध्यमातून काल वसमत तालुक्यातील नहाद येथे
व आज मरसूळ, राजवाडी येथे मनोरंजनाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करत माहिती दिली.
संत गजानन महाराज लोककला व पथनाट्य मंडळाचे नामदेव कल्याणकर यांच्या पथकानेही काल
हिंगोली तालुक्यातील उमरा वाबळे येथे लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन करत शासनाच्या
विविध योजनांची, उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. अशाप्रकारे
जिल्ह्यातील 63 गर्दीच्या ठिकाणी लोककला पथकाद्वारे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमांस जनतेतूनही
भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
******
No comments:
Post a Comment