व्यवसाय
करदात्यांना विवरणपत्र भरण्यासाठी विलंब माफी योजना जाहिर
हिंगोली, दि.15 (जिमाका) : शासनाने
व्यवसाय कर कायदा 1975 अंतर्गत नोंदीत व्यवसायकर धारका साठी दिनांक 25 फेब्रुवारी
2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार व्यवसाय करदात्यांसाठी नवीन विलंब शुल्क
माफी योजना जाहीर केली आहे. हे कर
विवरणपत्र नियमित कालावधीसाठी भरणे गरजेचे असते. अन्यथा तीस दिवसांपर्यंत
उशिरासाठी दोनशे रुपये व त्यानंतरच्या विलंबासाठी एक हजार रुपये विलंब शुल्क
आकारले जाते.
ज्यांचे कर व विवरणपत्र भरणे बाकी
आहे, त्यांच्यासाठी शुल्क माफी योजना जाहिर करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2021
पर्यंतच्या कालावधी करिता प्रलंबित असलेली आपली सर्व विवरणपत्र फक्त कर व
व्याज भरुन कोणतेही विलंब शुल्क न भरता
दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत विभागाच्या संकेतस्थळावर दाखल करता येणार आहेत. या
योजनेची सर्व माहिती www.mahagst.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हिंगोली
जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती
साठी व्यवसाय कर अधिकारी यांचे कार्यालय, जीएसटी भवन रिसाला बाजार हिंगोली यांच्याशी
संपर्क साधावा असे आवाहन व्यवसाय कर अधिकारी पी.एस. तपासे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment