हिंगोली जिल्ह्यासाठी 873 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर
हिंगोली (जिमाका), दि. 03 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत
जिल्हयातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे जानेवारी, फेब्रुवारी
व मार्च-2023 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो
याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्याचे जिल्ह्यासाठी 873 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल
करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण
करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्यात आले आहे. हिंगोली-225 क्विंटल, औंढा ना.-99 क्विंटल, सेनगाव-186 क्विंटल,
कळमनुरी-187 क्विंटल, वसमत-176 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 873 क्विंटल साखरेचे
नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य
दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment