रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त
महिलांची हेल्मेटसह मोटार सायकल रॅली
हिंगोली (जिमाका), दि. 18
: जिल्ह्यात दि.
11 जानेवारी ते 17 जानेवारी, 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान-2023 राबविण्यात
आला आहे. या अभियानामध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम आयोजित
करण्यात आले होते. त्यामध्ये नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, वाहनाना रेडियम लावणे, रस्ता
सुरक्षाविषयी जनजागृती करणे, विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यासाठी
व्याख्यानाचे आयोजन करणे, तसेच प्रभात फेरी काढणे इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले
होते.
या अभियानाचा निरोप समारंभ दि. 17 जानेवारी,
2023 रोजी सकाळी 9.00 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान, हिंगोली येथील प्रांगणात
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून महिलांची हेल्मेटसह मोटार सायकल रॅली काढण्यात
आली.
या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील
अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. या मोटार सायकल रॅलीचे
नियोजन वाहतूक शाखेच्या नलिनी काळपांडे यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी केले.
****
No comments:
Post a Comment