19 January, 2023

 

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रदान करण्यात येतो. तसेच क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार / जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येते.

शासनाने नुकत्याच 14 डिसेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचे नमुने http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपलब्ध आहे. अर्जाचे नमुने प्राप्त करुन व्यवस्थितरित्या भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लिंबाळा मक्ता ता.जि. हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

*****

No comments: