स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मंजूर समुदाय
आधारित संस्थांची बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 19
: मा. प्रकल्प संचालक,
आत्मा तथा प्रमुख जिल्हा अंमलबजवणी कक्ष, हिंगोली यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 19
जानेवारी, 2023 रोजी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मंजूर समुदाय आधारित संस्थांची बैठक घेण्यात
आली.
यावेळी जिल्हा अधीक्षक
कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी स्मार्ट प्रकल्पाबाबत माहिती दिली. तसेच नोडल अधिकारी
जी. बी. बंटेवाड यांनी सीबीओंना (CBO) बँकेमध्ये खाते उघडण्याबाबत व लातुर येथील विभागीय
संपादन अधिकारी फराज सय्यद यांनी संपादन प्रक्रियेबाबत माहिती दिली.
या वेळी पुरवठा
व मुल्य साखळी तज्ञ जी. एच. कच्छवे , अर्थशास्त्रज्ञ तथा वित्तप्रवेश सल्लागार जितेश
नालट, लेखापाल मोहीब शेख उररहेमान, संगणक चालक अजय चक्के व CBO चे 10 संचालक हजर होते.
*****
No comments:
Post a Comment